साकोली: भारत सभागृहात विदर्भशाहीर कलाकार परिषदेच्या भंडारा शाखेतर्फे जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान शाखा भंडारा यांच्यातर्फे जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे दोन दिवसीय आयोजन साकोली येथील नागझिरा रोडवरील भारत सभागृहात करण्यात आली आहे 15 व 16 ऑक्टोबरला अशा दोन दिवसीय महोत्सवात 200 कलाकाराच्या मंडळांनी सहभाग घेतला आहे गुरुवार दि.16 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता या महोत्सवाचे उद्घाटन झाले तर रात्री दहा पर्यंत हा महोत्सव चालणार आहे विदर्भ शाहीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रामनाथ पारधीकर यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे