भडगाव: पिपंरखेड येथे पुन्हा पाण्यावर तरंगलेला मृतदेह मआढळल्याने नातेवाईकांचा आक्रोश, केला चक्का जाम,
भडगाव तालुक्यात पिंपरखेड गावात गावातील वाल्मीक नामक तरुण वय 27 वर्ष हा दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7:00 वाजता पाण्यात तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्या कामी चौकशी सुरु असततानाच तोच आज दिनांक 16 नोव्हेबर 2025 रोजी नारायण नामक तरुण त्याच ठिकाणी पाण्यात तरंगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पिपंरखेड गावात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती पोलीस पाटील भाईदास महाजन यांनी भडगाव पोलिसांना देताच पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेतली.