चामोर्शी: गडचिरोलीच्या रस्ते विकासासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा.
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रस्ते प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत गडचिरोली जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांबाबत तसेच रिंग रोडच्या उभारणीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.जिल्ह्याच्या प्रगतीसाठी उत्तम दर्जाचे रस्ते किती आवश्यक आहेत, यावर बैठकीत भर देण्यात आला. रस्ते चांगले झाल्यास जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था सुध