जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चांदी धातूमधील सहा फूट उंचीची पूर्णाकृती मूर्ती लोकवर्गणीतून व स्वखर्चातून उभारण्यास तात्काळ परवानगी द्यावी, अशी मागणी संबंधित कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. मंगळवार दि. 16 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार विकास लहाने हे या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. या मागणीसाठी यापूर्वी वंजार उम्रद येथे 5 ऑगस्ट 2024 रोजी तसेच जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं होतं.