हिंगणघाट: सरकारच्या अतिवृष्टी पॅकेजविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेधात्मक काळी दिवाळी
हिंगणघाट शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, जेष्ठ नेते सुनिल राऊत यांच्या नेतृत्वात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचा तहसील कार्यालयासमोर तीव्र निषेध करण्यात आला.यावेळी मागणी करण्यात आली की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी ₹५०,००० मदत, आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ₹७५,००० प्रोत्साहनपर मदत या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांच्या घरात आजही अंधार असे मत व्यक्त केले.