बुटीबोरी येथील नवीन एमआयडीसीमधील आवादा कंपनीत आज सकाळी सुमारास पाण्याची टाकी फुटून मोठी दुर्घटना घडली. १५ हजार लिटर क्षमतेच्या ॲल्युमिनियम टाकीची टेस्टिंग सुरू असताना पाण्याच्या प्रचंड दाबामुळे हा स्फोट झाला.या दुर्घटनेत एकूण ६ कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे.३ कामगार गंभीर जखमी असून ६ जण किरकोळ जखमी आहेत. जखमींवर एम्स, मेडिकल आणि माया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.