लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर चांदपूर येथील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान श्री हनुमानाचे खासदार प्रफुल भाई पटेल यांनी मनोभावे दर्शन घेऊन महाआरती केली. महारुद्र हनुमंताच्या चरणी लीन झाल्याने मन अत्यंत प्रसन्न झाले. असे खासदाराने आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राज्यातील जनतेस सुख, समृद्धी आणि निरोगी आयुष्य लाभावे यासाठी मनःपूर्वक प्रार्थना केली. तसेच मंदिराचे पुजारी आणि भाविकांशी संवाद साधत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.