उदगीर तालुक्यात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात दर्श वेळ अमावस्या १९ डिसेंबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली,दर्श वेळ अमावस्या निमित्त शेतकऱ्यांनी शेतात पूर्वेकडे तोंड करून कडब्याची कोपी बांधली,कोपी मध्ये पंचमहाभूते पाच पांडवांची पूजा केली,चविष्ट भाकरी,भज्जी,अंबिल,या भोजनाची मेजवानीचा स्वाद सर्व जाती धर्मातील निमंत्रित लोकांनी घेतला, दर्श वेळ अमावस्या सणांची परंपरा तब्बल सातशे वर्षांची आहे,निसर्गाची योग्य वेळ साधने म्हणजे हा दर्श वेळ अमावस्येचा सण होय