रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहन तपासणीत पारदर्शकता आणण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी आता प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) मानवी हस्तक्षेपाऐवजी स्वयंचलित चाचणी केंद्रे (एटीसी) कार्यान्वित होणार आहेत. नव्या वर्षात ही नती यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू