अक्कलकुवा: अक्कलकुवा भाजपा कार्यालय येथे काँग्रेस शिवसेना शिंदे गट कार्यकर्ते भाजपात प्रवेश
नंदुरबार जिल्ह्यात आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाच्या वारी सुरू झाले आहेत. माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विकासात्मक कार्यशैलीवर विश्वास ठेवत आज १७ ऑगस्ट रोजी रविवारी दुपारी बाराच्या सुमारास भाजपा कार्यालय अक्कलकुवा येथे काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे अक्कलकुवा तालुक्यातील हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.