रिसोड तालुक्यातील शेलुखडसे गावातून एक अतिशय दुःखद घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने गणेश खडसे यांनी आपल्या 9 वर्षीय वेदांत नावाच्या मुलालाही शेतात नेलं. यावेळी सगळं कुटुंबीय रब्बी हंगामाच्या शेतीच्या कामात व्यस्त होतं. मात्र याच वेळी काळानं घात केला आणि कामसुरू असताना अचानक एका विषारी सापाने वेदांतला दंश केल्याची घटना घडली. यात 9 वर्षीय वेदांतचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.