बुलढाणा: पिक विमा योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून, विमा कंपन्यांच्या खिशात पैसा भरण्यासाठी - शेतकरी नेते रविकांत तुपकर
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान शेतकऱ्याचं होतं, पण मालामाल विमा कंपनी होते. पीकविमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना लुटण्याचीच व्यवस्था सरकारने निर्माण केली आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून, विमा कंपन्यांच्या खिशात पैसा भरण्यासाठीच आहे.असे मत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 14 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता व्यक्त केले आहे.