चाळीसगाव: एसटी आरक्षणासाठी चाळीसगावात बंजारा समाजाचा ऐतिहासिक मोर्चा
चाळीसगाव तालुक्यात प्रथमच बंजारा समाजाने एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे एक लाख समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. मराठा समाजाच्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर, हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारावर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.