जालना: बनावट वेबसाइटद्वारे लर्निंग लायसन्स काढून फसवणूक करणाऱ्याला जम्मू काश्मीर मधून घेतलं ताब्यात; चार दिवसाची पोलीस कोठडी
Jalna, Jalna | Dec 17, 2025 लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेला बायपास करून बनावट वेबसाईटद्वारे फसवणूक करणार्या एका अनधिकृत वेबसाइटचा पर्दाफाश केल्यानंतर जालना पोलीसांनी एका आरोपीला अटक केली होती. त्यानंतर जम्मू काश्मिर येथून एका आरोपीला अटक करण्यात आली. बुधवार दि.17 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वा.मिळालेल्या माहितीनुसार फैसल बशीर मिर याला जालना न्यायालयात हजर केले असता 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.जम्मू काश्मिर येथील फैसल बशीर मिर याला अटक करण्यासाठी जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गेले होते.