यवतमाळ: तिवसा येथे एकास लोखंडी रॉडने मारहाण,आरोपी विरुद्ध लाडखेड पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी जितेंद्र शंकर जाधव यांच्या तक्रारीनुसार 21 ऑक्टोबरला दोन वाजताच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ शंकर जाधव याला आरोपी पप्पू राठोड याने जीवाने ठार मारण्याचे उद्देशाने लोखंडी रॉडणे डोक्यावर व हातावर मारहाण करून गंभीर जखमी केले.तसेच शिवीगाळ करून जीवाने मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी 21 ऑक्टोबरला सायंकाळी अंदाजे साडेसात वाजताच्या सुमारास लाडखेड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.