अमळनेर: जून्या वादातून मांडळ येथे तरूणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; मारवड पोलीसात गुन्हा दाखल
जुन्या वादातून एका तरूणाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील मांडळ गावात रविवारी २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला.