सेलू: रेहकी येथे आजाराला कंटाळून २१ वर्षीय तरुणाची आत्महत्या; सेलू पोलिसांत मर्ग दाखल
Seloo, Wardha | Nov 8, 2025 तालुक्यातील रेहकी येथे आजाराने त्रस्त झालेल्या २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी ता. ८ ला दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुणाचे नाव प्रमोद पंजाबराव साखरकर (वय २१, रा. रेहकी) असे आहे. या प्रकरणी त्याचा भाऊ शाम साखरकर यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलिसांनी सायंकाळी ६.१५ वाजता अकास्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून देण्यात आली.