मलकापूर: धरणगाव येथे धरणगाव शिक्षण समितीचा 75 वा वर्धापनदिन साजरा
मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथे 1 आक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता धरणगाव शिक्षण समितीचा 75 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती,अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरणराव सरनाईक,एन.जे.फाळके,एन.बी शिंदे,शैलेश रेगे,विलास पाटील,अनंत पाटील,राजेंद्र खडसे,संजय काजळे,व्ही.आर.पाटील,राजू कोचर,गावंडे यांच्यासह इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.