आज शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली कीगंगापूर-वैजापूर महामार्गावर आज मांजरी फाट्याच्या पुढे दोन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूरकडून वैजापूरच्या दिशेने जाणारी कार आणि विरुद्ध दिशेने येणारी दुसरी कार यांच्यात मांजरी पाटीच्या पुढे जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही कारचा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे.