गोंदिया: आचारसंहितेआधी कोट्यवधींच्या कामांना मंजुरी...जिल्ह्यात २१० कामांना मान्यता
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासात्मक कामे केली जातात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका व आचारसंहिता लक्षात घेता निधी अखर्चित राहू नये म्हणून पंचायत विभागाकडून जनसुविधा योजनेंतर्गत कामांना मंजुरी दिली जात आहे.या योजनेंतर्गत गावातील मूलभूत गरजांनुसार आवश्यक असलेल्या कामांसाठी निधी दिला जातो. ही कामे जिल्हा नियोजन समितीमार्फत निवडली जात