शहरात कर्णकर्कश आवाज करून नागरिकांची झोप उडवणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध वैजापूर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. सायलन्सरमध्ये बदल करून फटाक्यांसारखा आवाज काढणाऱ्या ८ बुलेटचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यांचे सायलन्सर जप्त करून एकूण ८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.