अंबरनाथ: बदलापूर मध्ये परप्रांतीय फेरीवाल्यांकडून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ
आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास बदलापूर येथे काही परप्रांतीय फेरीवाल्यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली. नगर परिषदेची टीम आज अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत होती. मात्र कारवाईदरम्यान काही परप्रांतीय फेरीवाल्यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर मनसे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले व शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना चांगला चोप दिला.