अर्जुनी मोरगाव: केशोरी येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'रन फॉर युनिटी' चे आयोजन संपन्न
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त (राष्ट्रीय एकता दिवस) केशोरी पोलीस स्टेशन च्या वतीने 'रन फॉर युनिटी' (एकता दौड) या कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन दिनांक 31 ऑक्टोंबर ला सकाळी सहा ते साडेआठ वाजता दरम्यान करण्यात आले. देशाची एकता आणि अखंडता जतन करण्याचा संदेश देण्यासाठी ही दौड आयोजित करण्यात आली होती.