मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत निलंगा मतदारसंघातील निलंगा, देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यांमधील पाणंद रस्त्यांच्या पुरवणी आराखड्यास मान्यता दिल्याबद्द्ल आ. निलंगेकर यांनी आभार व्यक्त केले आहे पाणंद रस्ते म्हणजे शेतकरी व शेती आधारित अर्थव्यवस्थेचा फार मोठा आधार आहेत. परंतु गेली अनेक वर्ष या रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित राहिला होता.