यवतमाळ: शिवाजीनगर दराटी येथे शुल्लक कारणातून एकास मारहाण,आरोपी विरुद्ध दराटी पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी अनिल तुळशीराम जाधव यांच्या तक्रारीनुसार 27 नोव्हेंबरला आरोपी किशोर जाधव यांच्या मुली सोबत फिर्यादीची मुलगी खेळत असताना आरोपी हा त्याच्या पत्नीला तू आपल्या मुलीला का बरं फिर्यादीच्या मुली सोबत खेळू दिले असे म्हणून वाद करत होता त्यावेळी फिर्यादी हा आरोपीस समजावण्याकरिता गेला असता आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून चुलीत पेटलेले जळके लाकूड फिर्यादीच्या मानेवर पाठीवर मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी 29 नोव्हेंबरला दुपारी अंदाजे दोन वाजताच्या सुमारास दराटी पोलिस...