शिरपूर: शहरातील वरवाडे परिसरात बेकायदेशीर गॅसपंप उद्धवस्त,धुळे एलसीबीचा छापा,गॅस सिलेंडर,व साहित्यासह एक ताब्यात तर दुसरा फरार
Shirpur, Dhule | Oct 19, 2025 जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आदेशीत केल्याने व धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन शिरपूर शहरातील वरवाडे परिसरात 19 ऑक्टोबर रोजी सकाळी एलसीबीच्या पथकाने छापा टाकून घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनात गॅस भरून देणाऱ्या गॅसचा मिनीपंप उद्धवस्त करीत गॅस सिलेंडर,इलेक्ट्रिक मोटर,नोझल व अन्य साहित्य असे 18 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा करण्यात आला.