आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी आगामी महापालिका निवडणूक एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्यात युती झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भातील महत्त्वाची माहिती भाजपचे संकटमोचक आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी बुधवारी २४ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता पत्रकार परिषदेत दिली.