कोपरगाव: कोळपेवाडीतील कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याच्या 71 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात
कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 71 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज 14 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ कारखाना कार्यस्थळावर माजी आमदार अशोकदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली व व्हा. चेअरमन प्रविण शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी गौरी शिंदे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करुन पार पडला. यावेळी आ.आशुतोष काळे यांच्यासह कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, सुधाकरजी रोहोम, दिलीपराव बोरनारे, डॉ. मच्छिन्द्रजी बर्डे, सूर्यभानजी कोळपे, राजेंद्रजी घुमरे, सचिनजी चांदगुडे उपस्थित होते.