गोंदिया नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रभाग क्रमांक १२ ते १७ च्या इच्छुक उमेदवार,पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बाहेकर हॉस्पिटल जवळ,मामा चौक गोंदिया येथे खा.प्रफुल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात गोंदिया नगर परिषदेची निवडणूक मजबुतीने लढणार असून सर्व कार्यकर्त्यांनी उमेदवारांना विजयी बनविण्याच्या दृष्टीने कामाला लागावे असे आवाहन करण्यात आले.