पनवेल: वायू प्रदूषण प्रतिबंधक उपाययोजनांच्या जोडीला हवा प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन
Panvel, Raigad | Dec 1, 2025 नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत ठोस उपाययोजना करण्यास सुरूवात झाली असून आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार सर्वच विभाग क्षेत्रात सखोल स्वच्छता मोहीमा प्रभावीपणे राबविल्या जात आहे. यामध्ये दैनंदिन स्वच्छतेप्रमाणेच मुख्य रस्त्यांवरील माती साफ करुन रस्ते प्रक्रियाकृत पाण्याने धुवून घेण्यात येत आहेत. याशिवाय हवेत एनकॅपच्या वाहनाने प्रक्रियाकृत पाणी फवारून हवेतील धुलीकण कमी करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे बांधकाम साईट्स, कॉरी व सिमेंट निर्मितीचे आरएमसी प्लान्ट यांचेमार्फत वायू प्रदूषण होणार नाही याकडेही विभागीय स्तरावर स्थापन केलेल्या विशेष पथकांकडून काटेकोर लक्ष दिले जात आहे.