दिग्रस शहरात आज दि. ५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान खासदार संजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा पंचशीला इंगोले यांचा पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न झाला. यावेळी खासदार देशमुख यांनी दिग्रस नगर परिषद भ्रष्टाचारमुक्त करून नागरिकांची सर्व कामे प्राधान्याने करण्यात येतील, तसेच दिग्रस शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. नवनिर्वाचित नगराध्यक्षा पंचशीला इंगोले यांनी दिग्रसच्या विकासासाठी दिवस-रात्र मेहनत घेऊन शहर समस्या-मुक्त करण्याचा संकल्प केला.