गोरेगाव: जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांची उपसभापती महारवाडे यांनी घेतली भेट.......विविध विकासात्मक मुद्द्यावर चर्चा...
पंचायत समिती गोरेगाव चे उपसभापती रामेश्वर महारवाडे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची भेट घेत गोरेगाव तालुक्यातील रखडलेल्या विकास कामासंदर्भात चर्चा केली. गोरेगाव तालुक्यातील अनेक गावात आजही सिंचनाचा प्रश्न आहे. मुख्य रस्ते, पानंद रस्ते, अवकाळी पावसाचा फटका, शेतकऱ्यांना सरसकट मदत, एमआरजीएस अंतर्गत रखडलेले विकास कामाचे देयक, घरकुलाचे रखडलेले हप्ते आदी विषयावर चर्चा करण्यात आली.