पो.स्टे.रामटेक अंतर्गत येणाऱ्या मानापूर शिवारात नाल्याच्या काठावर झाडी झुडपात हातभट्टी लावून मोहापूल दारू काढत असल्याच्या गुप्त माहितीवरून मंगळ. दि. पंचेवीस नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता च्या दरम्यान रामटेक पोलिसांनी धडक कारवाई करीत आरोपी अमोल मारुती लिल्लारे वय 28 वर्षे रा.चिचाळा त. रामटेक याच्यावर कारवाई करत 200 लिटर मोहफूल गावठी दारू किंमत वीस हजार रुपये तसेच अन्य साहित्य असा एकूण एक लाख 45 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. यातील भट्टी व साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले.