सातारा: साताऱ्यातील विविध शाळांमध्ये पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती अभियान
Satara, Satara | Nov 28, 2025 सातारा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी साताऱ्यातील विविध शाळांमध्ये पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. मतदान हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून प्रत्येक मताचे महत्व अधोरेखित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.विद्यार्थ्यांनी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मतदानाचे महत्व, मतदान न केल्यास होणारे परिणाम, तसेच सुशिक्षित समाजाची गरज अशा विविध सामाजिक संदेशांवर आधारित पथनाट्य सादर केले