भंडारा: पालकमंत्री पंकज भोयर यांनी माजी खासदार सुनील मेंढे यांच्या भंडारा येथील निवासस्थानी दिली भेट
भंडारा दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा वर्धा-भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ही भेट रविवार 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पार पडली. सुनील मेंढे यांच्या कुटुंबीयांकडून पालकमंत्री पंकज भोयर यांचे पारंपरिक औक्षण करून त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. या सदिच्छा भेटीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला.