हिमायतनगर: पळसपुर येथे घराची भींत पाडल्याच्या कारणावरून 60 वर्षीय इसमास गंभीर दुखापत केली; पिता पुत्रावर हि.नगर पोलिसात गुन्हा दाखल
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथे दि 24 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी सातच्या सुमारास यातील आरोपी 1) बाबुराव वानखेडे 2) अवधुत वानखेडे यांनी यातील फिर्यादीस घराचे भिंत पाडण्याचे कारणावरून शिवीगाळ करून लाकडाने हाताचे करंगळीला मारहाण करून फॅक्चर करून गंभीर दुखापत केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी फिर्यादी नागोराव वानखेडे वय साठ वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज रोजी दुपारी हिम्मतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे.