कल्याण: कल्याण मुरबाड रोडवर धावत्या जेसीबीला लागली आग
Kalyan, Thane | Nov 26, 2025 आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 4च्या सुमारास कल्याण मुरबाड रोडवर एका धावत्या जेसीबीला आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याचे लक्षात येताच जेसीबी चालकाने धावता जेसीबीमधून उडी घेतली, त्यामुळे चालकाचा जीव बचावला. कल्याणवरून मुरबाडच्या दिशेने जाताना ही घटना घडली. भर रस्त्यात ही घटना घडल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवले.