मंगळवेढा: चडचण बँक दरोड्यातील मुद्देमाल सापडला हुलजंती येथील पडक्या घरावर, कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात दिला मुद्देमाल
कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील स्टेट बँकेवर झालेल्या दरोड्यानंतर मंगळवेढा पोलिसांना एक महत्त्वाचा धागा लागला आहे. मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावातील एका पडक्या घरातून सोन्याचे दागिने व रोकड असलेली संशयास्पद बॅग सापडली आहे. स्थानिक नागरिकांनी गावातील पडक्या घरात बॅग पडलेली दिसल्याने संशय व्यक्त करत पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे आणि कर्नाटक पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.