राजकारणात कोण कधी कुठल्या पक्षात जाईल, हे निश्चितपणे सांगता येत नाही, असे सूचक विधान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज बुधवारी सायंकाळी राहुरी शहरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते जामखेड येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांच्या निवडीबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास भाजपसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.