गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुर्री चुटीया मार्गावर झालेल्या अपघातात राहुल यालाला वय 29 वर्ष राहणार गौतम नगर सिव्हील लाईन गोंदिया हा तरुण ठार झाला. त्याला केटीएस रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत्य घोषित केले. दिनांक 17 डिसेंबर रोजी बुधवार ला पहाटे साडेचार वाजता दरम्यान घडलेल्या या अपघातात गोंदिया शहर पोलिसांनी मर्ग नोंद केला आहे. तपास सुरू आहे.