महाड: महाड तालुका 24 तास अंधारात!निवडणुकीत मतांचा जोगवा मागणारे नेते गायब,जनतेने दाद कोणाकडे मागायची-सरपंच सोमनाथ ओझर्डे यांच
Mahad, Raigad | Apr 19, 2025 तब्बल २४ तास उलटून गेले तरी महाड तालुका अंधाराच्या साम्राज्यात पसरला असून महाड औद्योगिक वसाहत परिसरात विद्युत पुरवठा करणाऱ्या केबल रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारामुळे तुटल्याने पूर्ण तालुक्या सहित महाड शहरात वीज पुरवठा २४ तासापासून खंडित झाला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना मतांचा जोगवा मागणारे नेते मात्र गायब झाले असून तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे या जनतेने न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल शिरगाव ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांनी राजकीय पुढार्यांना