साकोली: वडद येथील पहाडीचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी साकोली यांना देण्यात आले निवेदन
साकोली तालुक्यातील वडद येथील गट क्रमांक 176 या पहाडीचे अवैध उत्खनन केले जात असून अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सावरबंधचे ग्रामपंचायत सदस्य देवचंद चांदेवार व सामाजिक कार्यकर्ते रामू लंजेवार यांनी उपविभागीय अधिकारी साकोली यांना दिलेल्या निवेदनातून शनिवार दि.20 सप्टेंबरला दुपारी चार वाजता केली आहे कारवाई न केल्यास 22 सप्टेंबर पासून तहसील कार्यारसमोर उपोषण करण्याचा इशारा देखील दिला आहे