नांदेड: आय.जी.कार्यालयासमोर सकाळी जॉगिंगसाठी गेलेल्या आजोबा व नातवास भरधाव हायवाने दिली धडक,नातवाचा मृत्यू तर आजोबा गंभीर जखमी
Nanded, Nanded | Nov 28, 2025 आज दि. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 ते 8 च्या दरम्यान आय. जी. कार्यालयासमोरील वाय पॉईंट येथे जॉगिंगहुन येत असताना आजोबा राजेश भूतके वय 48 व नातू प्रणव संपत आचार्य वय 4 वर्ष हे येत असताना हायवा क्र. RJ-04-GD-8751 च्या चालकाने भरधाव वेगाने येत सदरील आजोबा व नातू यांना धडक दिली होती यात प्रणव याचा मृत्यू तर आजोबा राजेश हे गंभीररित्या जखमी झाले होते.सदर हायवा चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.