नाशिक शहरातील सिडको परिसरात अंबड पोलिसांनी मटका जुगारावर कारवाई करत दोघांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दुपारी 3.27 वाजता सिडकोतील दत्त चौकाजवळ, एम.एस.ई.बी. कार्यालयाच्या भिंतीच्या आडोशाला कल्याण मटका जुगार खेळविताना आरोपी संदिप अंबादास बोंदर्डे (वय 49) व रवि जगन पवार (वय 28) आढळून आले. अंबड पोलीस ठाण्याचे पोहवा योगेश देसले यांच्या तपासात ही कारवाई करण्यात आली.कारवाईदरम्यान आरोपींकडून 1,050 रुपये रोख रक्कम व आकडे लिहिलेली डायरी जप्त केले