जामखेड: जामखेड मध्ये फक्त दर बुधवारी दुकाने बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय...!
जामखेड तालुक्यातील बिल्डिंग मटेरियल व सप्लायर्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत फक्त दर बुधवारी दुकाने बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोणत्याही संघटनेचा किंवा राजकीय पक्षांचा बंद असला तरीही दुकाने बंद ठेवली जाणार नाहीत. मंगळवारी संध्याकाळी बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.