करवीर: राजाराम तलाव परिसरातील वृक्षतोडीच्या विरोधात नागरिक आक्रमक; उग्र आंदोलनाचा इशारा -ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे
कोल्हापुरातल्या छत्रपती राजाराम तलावाच्या परिसरातील 110 वृक्ष तोडीविरोधात नागरिक रस्त्यावर उतरलेत. छत्रपती राजाराम जलतरण मित्र मंडळ आणि पर्यावरण प्रेमींनी या वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन पुकारले.महानगरपालिकेने वृक्ष लावण्याच्या कार्यक्रमांतर्गत हजारो वृक्ष लावलेले नाहीत मात्र वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून वृक्षतोड मात्र होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महापालिकेने तात्काळ ही वृक्षतोड थांबवावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी केलीय.