हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विहीरगाव परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना आज, सोमवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ९:४५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.मिळालेल्या माहितीनुसार, विहीरगाव येथील साईराम ढाब्याजवळ असलेल्या एका शेतात बाभळीच्या झाडाला एका अज्ञात व्यक्तीने गळफास घेतल्याचे दिसून आले. मृतदेह मफलरच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत होता.