वणी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर वणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे राजीनामा पत्रात नमूद केले आहे. त्यांनी राजीनामा पत्र जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांना पाठवले आहे