गोंदिया: वाडी एमआयडीसी येथे झालेल्या अपघातातील तरुणाचा मृत्यू , शहर पोलिसांनी घेतली घटनेची नोंद
Gondiya, Gondia | Nov 27, 2025 नागपूर येथील वाडी एमआयडीसी येथे झालेल्या अपघातात प्रवीण वैद्य वय पंचवीस वर्षे हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला मंगळवारी दिनांक 25 नोव्हेंबरला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या वर उपचार सुरू असताना दिनांक 26 नोव्हेंबर बुधवार ला सकाळी साडेसात वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे. तपास सुरू आहे.