जालना: सावरगाव हडप येथे वीज पडून वायरींगसह गणपती मंदिराचे मोठे नुकसान; सुदैवाने जिवीत हानी नाही
Jalna, Jalna | Sep 22, 2025 सोमवार दि. 22 सप्टेंबर 2025 रोजी सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास रामनगर साखर कारखान्याजवळील सावरगाव हडप शिवारातील दक्षिणमुखी गणपती मंदिरावर वीज कोसळल्याने मोठे नुकसान झाले. पहाटेच्या सुमारास एकदम जोराचा कडकडाट झाल्यानंतर विजेचा प्रचंड आवाज परिसरात घुमला. यावेळी मंदिराच्या छताच्या एका कोपर्याला धक्का बसला. तसेच मंदिरातील वायरिंग, लाईट व्यवस्था पूर्णपणे जळून गेल्याची माहिती मंदिराचे महाराज भरतगिरी बाबा यांनी दिली. घटनेच्या वेळी गावकर्यांना मोठा धक्का बसला.